गणपतीपुळे नजीक अपघातात कारच्या येथे धडकेने महिलेचा मृत्यू

घटनास्थळाहून कारचालकाचे पलायण

रत्नागिरी : रत्नागिरी -गणपतीपुळे मार्गावर मौजे धामणसे साबंरेवाडी येथे सुलोचना सांबरे (६५, राहणार धामणसे सांबरेवाडी) या महिलेला स्विफ्ट कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला

अपघातानंतर कारचालक तेथून पळून गेला
स्विफ्ट गाडी क्रमांक एमएच १३-बी एन ५५३१गाडीचा चालक गणपतीपुळे येथे चाफे अशी घेऊन जात असताना गाडी भरधाव वेगाने चालवत साबंरेवाडी गणपतीपुळे मार्गावर पायी चालत असलेल्या सुलोचना सांबरे या महिलेला समोरून धडक दिली या अपघातात सदर महिलेच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला हा अपघात काल सायंकाळी घडला अपघातानंतर कारचालक अपघात स्थळावरून खबर न देता पळून गेला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE