मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे शनिवारी रत्नागिरीत

संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर पहिला दौरा

रत्नागिरी  : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. भाजपचे त्यांची रत्नागिरीचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती जबाबदारी घेतल्यानंतर हा पहिला दौरा असून ते भाजपा संघटनात्मक बैठक घेणार आहेत.

ना. नितेश राणे हे शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता रत्नागिरी येथील मत्स्यव्यवसायीकांच्या समस्यांबाबत व मिरकरवाडा अतिक्रमणाबाबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेणार आहेत.


त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका येथे भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता मेळाव व सत्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत. पक्ष बळकटीसाठी भाजपने जिथे भाजपचा मंत्री किंवा आमदार नाही तिथे भाजपच्या मंत्र्यांवर संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामध्ये ना. नितेश राणे यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी असून त्यादृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE