कोकणातून मुंबईत जाणाऱ्या या तीन गाड्यांचा प्रवास आधीच संपणार!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलट क्रमांक 12 च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईत जाणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास त्यांच्या निर्धारित शेवटच्या स्थानकाच्या आधीच संपणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 12134 मंगळूरु जंक्शन ते मुंबई सीएसएमटी ही दैनंदिन सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी(12134) दिनांक 21 मार्च 2025 पर्यंत ठाणे स्थानकापर्यंत धावणार आहे. याचबरोबर मडगांव ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (22120) तेजस एक्सप्रेस दि.  ते 21 मार्चपर्यंत दादर जंक्शन पर्यंत धावणार आहे.

या गाडीशिवाय मडगाव ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही दैनंदिन जनशताब्दी एक्सप्रेस दिनांक 21 मार्च 2025 पर्यंत (12052) दादर जंक्शन पर्यंत धावणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE