चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण मधील चतुर्थ वर्ष कृषीच्या विद्यार्थिनी यांनी अनुभवात्मक शिक्षण मोड्युल मध्ये
पहिल्यांदाच विदेशी फळभाजी झुकीनी लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आणि त्यापासून उत्पादन मिळविले.
झुकीनी हे काकडीसारखे दिसणारे फळपीक असून गडद हिरव्या रंगाची लांब भाजी आहे. हि भाजी आपण जेवणासोबत काकडीप्रमाणे सलाड किंवा कोशिंबीरसाठी म्हणून वापरू शकतो. झुकीनी ही कमी कॅलरी आणि कमी शुगर असलेले पिक असून हे शरीरासाठी फायद्याचे असलेले पिक आहे. हे पिक लागवडीनंतर केवळ 30 ते 40 दिवसात काढणीला येते. झुकीनीचे बियाणे सर्वप्रथम प्रो ट्रे मध्ये लावून त्याची चांगली काळजी घेऊन 15 दिवसा नंतर त्याची लावणी केली. त्यानंतर 30 ते 35 दिवसात झुकीनी फळे लागायला सुरुवात झाली. झुकीनीला प्रती किलो रु. 90 ते 100 किंमत विद्यार्थिनींना विक्रीअंती मिळत आहे.
या लागवडीसाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, प्रकल्प इन्चार्ज प्रा. रोशन मोहिरे आणि इतर विषय शिक्षकांचे वेळोवेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.
