https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

कसब्यातील कर्णेश्वर मंदिरात उद्या सकाळी ७ वाजता किरणोत्सव!

0 76

संगमेश्वर : बुधवारी सकाळी ६.४७ वाजता सूर्योदय आहे. पूर्व क्षितिजावर तेजोनिधी भास्कर प्रकट होतील. सुमारे ७ वाजेपर्यंत लालबुंद गोळा आकाशात दिसू लागेल आणि पुढच्या पाचच मिनिटांत श्री कर्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवपिंडीवर आपल्या किरणांची मुक्तहस्ते उधळण करीत शंभू महादेवाना सोनेरी सचैल किरणांचे स्नान होईल. किरणोत्सव खगोल शास्त्र, स्थापत्य शास्त्र आणि धार्मिकता यांचा त्रिवेणी संगम प्रत्यक्ष अनुभव घेण्याजोगाच सोहळा आहे. सुमारे १० ते १२ मिनिटे हा सोहळा अनुभवता येणार आहे. शिवशंकरांना वंदन करून गगनराजाची पुढील वाटचाल सुरू होईल. मात्र ही ५ मिनिटे प्रत्यक्ष डोळ्यात साठवण्यासारखीच असणार आहेत.

गेली अनेक वर्षे कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरात मावळतीला जाणाऱ्या सूर्याने देवीचा किरणोत्सव होतो. कसबा येथील कर्णेश्वर मंदिरात मात्र उगवत्या सूर्याच्या किरणांनी हा उत्सव अनुभवता येणार आहे. अकराव्या शतकातील शिल्प समृद्ध अशा कर्णेश्वर मंदिरात हा अनुपमेय सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी उद्या सकाळी ७ वाजता श्री क्षेत्र कर्णेश्वर कसबा संगमेश्वर येथे भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.