रत्नागिरी : अवघ्या ८ व्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड मध्ये नाव नोंदवलेली सैतवडे येथील कुमारी समायरा रुमान पारेख हिचा आज तिची शाळा न्यू इरा इंग्लिश स्कूल सैतवडे तसेच न्यू इरा एज्युकेशन सोसायटीच्या-वतीने मोठा सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ न्यू इरा इंग्लिश स्कूल सैतवडे या प्रशालेत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
याकार्यक्रमाची सुरुवात न्यू इरा स्कूल च्या विद्यार्थ्यांनी इस्लामिक किरात पडून केली. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी इस्लामिक नात पडून कार्यक्रम पुढे नेला. नंतर सत्कार कार्यक्रमाला सुरुवात झाली. न्यू इरा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री अकबर डिंगणकर यांच्या हस्ते समायराचा पुष्पगुच्छ, शाल, ट्रोफी आणि बक्षीस देवून सत्कार करणेत आला. न्यू इराच्या मुख्याध्यापिका डोंगरकर मेडम तसेच सामायाच्या वर्गशिक्षिका आणि इतर शिक्षकांनी सुद्धा सामायाराचे भरभरून कौतुक केले. समायरा ही नुसती सैतवडे गावातील नसून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलीच विद्यार्थीनी आहे की जिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड मध्ये नोंद झाले आहे. यासाठी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री अ. रहीम हसन माद्रे यांनी सुद्धा खूप कौतुक करून बाकीच्या विद्यार्थ्याना सुद्धा प्रोत्साहित केले. सामायराची आई श्रीमती फरीन रुमान पारेख यांनी सुद्धा या सत्काराबद्दल शाळा आणि संस्थेचे आभार मानले. सामायाराने आपल्या यशाचे श्रेय हे आपले आजी आजोबा, आई वडिलांसोबत संपूर्ण शिक्षक वर्ग तसेच शाळेला दिले.
ह्या सत्कार कार्यक्रमासाठी न्यू इरा एक्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री अकबर डिंगणकर, सेक्रेटरी श्री सादिक कापडे, अन्य सोसायटी सभासद श्री मुनाफ वागले, अजीज माद्रे, फरमीन निवेकर, शाळेची मुख्याध्यापिका डोंगर करमेडम, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री रहीम हसन माद्रे, सभासद श्री हशमत अली निवेकर, सरपंच श्रीमती उषा पवार, समायराचे आजोबा श्री मकबूल पारेख, आजी श्रीमती अनिसा पारेख, आई श्रीमती फरीन पारेख, वडील श्री रुमान पारेख तसेच पत्रकार जमीर खलफे आदी उपस्थित होते.
सर्वानी समायराचे कौतुक करून शाळेचे तसेच संपूर्ण गावासाहीत रत्नागिरी जिल्ह्याचे नाव मोठे केल्याबद्दल अभिनंदन केले.