खेडचा बालवैज्ञानिक स्पंदन धामणे याचे प्रदूषणविरहित रॉकेट लॉन्चिंग मॉडेल लक्षवेधी

  • अमरावती येथील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात पटकावला पाचवा क्रमांक

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली येथील स्पंदन धामणे याने राज्यस्तरावरील बालैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात पाचवा क्रमांक पटकावला. कोणतेही प्रदूषण न करता रॉकेट लॉन्चिंग करणे शक्य होईल, तसेच एका दिवसात अनेक लॉन्चिंग शक्य होतील. पारंपरिक रॉकेट लॉन्चिंग पद्धतीला पर्याय ठरणारे ‘घूमर द स्पिन अँड जर्क लाँचर’ हे विज्ञान मॉडेल स्पंदनने या प्रदर्शनात मांडले होते.

स्पंदन सध्या खेड येथील रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिकत असून त्याने या शाळेचे नेतृत्व केले होते.

अमरावती : येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेला स्पंदन धामणे व त्याची मार्गदर्शक आई शर्वरी धामणे.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, विभागीय शिक्षण उसंचालक – अमरावती, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती, शिक्षण विभाग यांच्यावतीने हे प्रदर्शन झाले. अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था-अमरावती द्वारा संचलित विज्ञान महाविद्यालय येथे हे ५२ वे राज्यस्तरीय बालैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन झाले.

अमरावती : मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना स्पंदन धामणे, आई शर्वरी धामणे व वडील डॉ. गौरव धामणे.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE