रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील आंगणेवाडी जत्रेसाठी मध्य रेल्वे कडून सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांचे आरक्षण आजपासून सुरू झाले आहे.
![](https://digikokan.com/wp-content/uploads/2025/02/20250209_2058018235774077247633406-859x1024.jpg)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या जत्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वेने मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यासाठी मध्य रेल्वेने आतापर्यंत दोन गाड्यांच्या मिळून आठ फेऱ्या तर कोकण रेल्वेने देखील परतीच्या प्रवासासाठी दोन फेऱ्यांचे नियोजन केले आहे. आंगणेवाडी यात्रेसाठी जाहीर करण्यात आलेल्या या विशेष गाड्यांचे आरक्षण आज रविवारपासून खुले झाले आहे.
![](https://digikokan.com/wp-content/uploads/2025/02/20250209_2058575763596742733655576-859x1024.jpg)
![Digi Kokan](https://digikokan.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-21.26.08_951a2af7-150x150.jpg?d=https://digikokan.com/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)