- www.mahaswayam.gov.in वर नोंदणी करण्याचे आवाहन
रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी यांनी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिने पंडित दीनदयाळ उपाध्याय मेळाव्याचे 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्यादित, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.
नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. नोंदणी केलल्या उमेदवारांनी त्यांचेकडील युझर आयडी व पासवर्ड चे सहायाने दिनांक 24 फेब्रुवारी रोजीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन अप्लाय करुन मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरीता त्यांचे बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया या कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे, आवाहनही सहाय्यक आयुक्त श्रीमती शेख यांनी केले आहे.
![Digi Kokan](https://digikokan.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-21.26.08_951a2af7-150x150.jpg?d=https://digikokan.com/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)