प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी निवडीचा ‘लकी ड्रॉ’ संपन्न

  • मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांची निवड

मुंबई, दि. १४ :  प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत विविध लाभांचे वाटप करण्यासाठी आज लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालेल्या लकी ड्रॉमध्ये या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.

मित्तल टॉवर येथील मत्स्य व्यवसाय आयुक्तालयामध्ये या लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहित आणि रोहित या दोन लहामुलांच्या हस्तेही काही लाभार्थ्यांच्या चिठ्ठ्यांची निवड करण्यात आली.

यावेळी मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मत्स्य उद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम यांच्यासह विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या लकी ड्रॉमध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील 17 विविध योजनांच्या एकूण 234 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. एकूण 89 कोटी 11 लाख रुपयांचा लाभ या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.
गोड्या पाण्यातील मत्स्य बीज पालन या महिलागटासाठी एकूण 6 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 25 लाख रुपये प्रती लाभार्थी या प्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा लाभ या योजनेतून दिला जाणार आहे. सर्वसाधारण गटातील प्रमोशन ऑफ रिक्रेशनल फिशरीज या 50 लक्ष रुपयांच्या योजनेचा लाभ एका लाभार्थ्याला देण्यात आला. मत्स्य तलाव जैविक प्रकल्प या 50 लक्ष रुपयांच्या प्रकल्पाचा लाभ अनुसुचित जमातीच्या 6 लाभार्थ्यांना आणि 32 महिला लाभार्थ्यींची निवड करण्यात आली. तसेच मत्स्य तलाव योजनेसाठी 6 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या योजनेमध्ये प्रत्येकी 25 लक्ष या प्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. मध्यम मत्स्य जैविक प्रकल्पासाठी 27 लाभार्थी निवड करण्यात आली. प्रत्येकी 25 लक्ष रुपये याप्रमाणे एकूण 6 कोटी 75 लक्ष रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. जलाशयामध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्य पालनासाठी 22 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या योजनेत प्रत्येकी 54 लक्ष या प्रमाणे एकूण 11 कोटी 88 लक्ष रुपयांचा लाभ दिला जातो. 10 टन क्षमतेचे शितगृह आणि बर्फ कारखाना उभारणे या योजनेसाठी 5 महिला लाभार्थींची निवड करण्यात आली. या योजनेत प्रती लाभार्थी 40 लक्ष या प्रमाणे एकूण 2 कोटींचा लाभ दिला जातो.
20 टन क्षमतेचे शितगृह आणि बर्फ कारखाना यासाठी 4 महिला लाभार्थी, प्रती लाभार्थी 80 लक्ष या प्रमाणे 3 कोटी 20 लक्ष रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. तर दीड कोटी रुपयांच्या 50 टन क्षमतेचे शितगृह आणि बर्फ कारखाना यासाठी एका महिला लाभार्थीची निवड करण्यात आली. 6 लाभार्थींना प्रत्येकी 25 लक्ष रुपयांच्या रेफ्रिजेरेटेड व्हेईकलचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेत एकूण दीड कोटींच्या लाभाचे वाटप होणार आहे. इन्सुलेटेड व्हेईकल गटात 16 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये प्रत्येकी 20 लक्ष या प्रमाणे एकूण 3 कोटी 20 लक्ष रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.

याशिवाय 75 हजार रुपयांच्या मोटार सायकल वुईथ आईस बॉक्स गटासाठी 9 लाभार्थी, 3 लक्ष रुपयांच्या थ्री व्हीलर वुईथ आईस बॉक्स इन्क्लुडिंग ई-रिक्शा फॉर फिश वेंन्डीग या गटासाठी 7 लाभार्थींची निवड करण्यात आली. 20 लक्ष रुपयांच्या लाईव फिश वेन्डींग सेंटरसाठी 37 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या गटात प्रत्येकी 20 लक्ष या प्रमाणे 7 कोटी 40 लाख रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.
30 लक्ष रुपयांच्या मिनी मिल्स ऑफ प्रोडक्शन कपॅसिटी ऑफ 2 टन अ डे या गटासाठी 12 लाभार्थी, 1 कोटी रुपयांच्या मिडियम मिनी मिल्स ऑफ प्रोडक्शन कपॅसिटी ऑफ 8 टन अ डे या गटासाठी 1, प्रत्येकी 10 लक्ष रुपयांच्या कन्स्ट्रक्शन ऑफ फिश किओस्क इन्क्लुडिंग किओस्क ऑफ ॲक्वेरिअम, ओर्नामेंटल फिश या गटासाठी 9 महिला लाभार्थी आणि पारंपारीक मच्छिमारांसाठी खोल समुद्रातील मासेमारीसाठीच्या नौकांना सहाय्य या योजनेसाठी 18 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रत्येकी 1 कोटी 20 लाख या प्रमाणे एकूण 21 कोटी 60 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.
या योजनांसाठी राज्यभरातून एकूण तीन हजार अर्ज आले होते. यापैकी 234 लाभार्थ्यांची निवड आज लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात आली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE