रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे सातारला वादळी पावसाचा इशारा

रत्नागिरी : ठाणे, रत्नागी जिल्ह्यांतील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या ताज्या इशाऱ्यात देण्यात आली आहे.

शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यात पुढील ३-४ तासांत नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन आयएमडी मुंबई यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

दरम्यान, रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील साखर पेनजीक दाभोळे बाजारपेठे शेजारी असणाऱ्या काही घरांवर रस्त्यावरील मोठमोठे आंब्याची झाडे उन्मळून पडली तर काहींच्या फांद्या मोडून रस्त्यावर पडल्या तर काही घरांचे छपरे उडून गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरांची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे

संगमेश्वर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे घराचे छप्पर उडाल्याची घटना.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE