उलवे विभागात शेकापनेच सुविधा उपलब्ध करून दिल्या :  प्रितम जे. एम. म्हात्रे

    उरण (विठ्ठल ममताबादे ) : उलवे हा सिडकोचा विकसित नोड आहे माञ येथील रहिवाशाना येथे अनेक सार्वजनिक, सामाजिक नागरी, जिवनावश्यक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. त्याबाबत सिडको पूर्णतः उदासिन असून येथील शेकापच्या ताब्यातील ग्रामपंचायती व पक्षाच्या पातळीवर येथील रहिवाशाना भेडसावणाऱ्या समस्या सोडवल्या आहेत. भविष्यातही येथील रहिवाशाच्या समस्या शेकाप आपल्या स्टाईलनेच सोडविल अशी ग्वाही उरण विधानसभा मतदार संघातील शेकाप महालिकास आघाडीचे उमेदवार प्रितम जे.एम. म्हाञे यानी दिली.

    महाविकास आघाडीच्या वतीने उलवे नोड येथे शेकाप उमेदवार प्रितमदादा म्हाञे याच्या प्रचारार्थ जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
    कार्यक्रमासाठी जेष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, कॉम्रेड भुषण पाटील प्रा. एल बी पाटील, उरण उत्कर्ष सभेचे गोपाल पाटील, आगरी समाज नेते राजाराम पाटील, रिपाई नेते महेश साळुंखे, काग्रेस उपाध्यक्ष व्ही. बी म्हाञे, पांडू मामा घरत, रवि घरत, रमाकांत म्हात्रे, कृष्णाजी म्हाञे, माधव पाटील, नारायणशेठ घरत, राजन घरत, धीरज कालेकर, सीमा घरत, जितेंद्र म्हाञे, विनोद साबळे, सचीन ताडफले, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रितमदादा म्हाञे म्हणाले शेकाप सत्तेसाठी कधीच राजकारण करीत नाही सत्ता असो वा नसो शेकाप जनतेच्या प्रश्न सोडवणूकीसाठी सतत जनतेत राहतो.अनेक आंदोलनाच्या माध्यमातून शेकापने अनेक प्रश्न सोडविले आहेत। या विभागात रेल्वेचा सरकता जिना तयार होवूनही गेली वर्षभर बंद होता तो जिना आपण जाऊन सूरू करायला लावला. शहर एवढे सुसज्ज आहे माञ शहरात कुठेही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. गव्हाण ग्रापच्या माध्यमातून आपण ती सुविधा उपलब्ध करून दिली. येथील शाळा प्रवेशाचे प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप दक्ष राहील तसेच येथीन सतावणाऱ्या लहानमोठ्या समस्या दूर करण्यासाठी चोविस तास सेवा केंद्र सुरू करणार असल्याचे त्यानी सांगितले. येथील बेकारी व बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी महिलाच्या आरोग्य सुविधासाठी विशेष अभियान राबवणार असल्याचेही त्यानी स्पष्ट केले. भाषणाच्या शेवटी त्यानी जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपल्याला संधी द्यावी आपला विश्वास आपण वाया जावू देणार नाही, असे आश्वासन त्यानी यावेळी दिले.

        Digi Kokan
        Author: Digi Kokan

        Leave a Comment

        READ MORE

        best news portal development company in india

        READ MORE