Ultimate magazine theme for WordPress.

अनाथ जनावरांच्या संरक्षणासाठी पुढाकार !

40

अनाथ गाई, पशु पक्षांसाठी द्रोणागिरी सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्था बोकडविराचा स्तुत्य उपक्रम

उरण (विठ्ठल ममताबादे ) : द्रोणागिरी सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्था बोकडविरा रजि नंबर २९१ उरण रायगड यांच्या तर्फे सकाळी रस्त्यावरील अनाथ गाई व पशु पक्षी यांना पाणी पिण्यासाठी व चारा, दाणे ठेवण्यासाठी बोकडविरा ते सिडको ट्रेनिंग सेन्टर या परीसरात भांडी ठेवण्यात आली.

 अतिशय कडक उन्हाळा सुरू आहे. अशा वेळेस अनाथ गाई,पशु पक्षी यांचा पाण्या अभावी तडफडुन मुत्यु होऊ नये. पाणी ,चारा, दाण्यांची गैरसोय होऊ नये. या उदेशाने  निस्वार्थ सेवेसाठी द्रोणागिरी सामाजिक कला क्रिडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्थेने हा स्तुत्य व माणुसकीच्या दृष्टीने उत्तम उपक्रम राबविला आहे.

या कार्यक्रमासाठी उपस्थित समाज सेवक विकास पाटील, घनश्याम पाटील, शिवकुमार पाटील, नरेंद्र पाटील, गंगाराम पाटील, शिवाजी ठाकूर,जितेंद्र पाटील , दिप्ती पाटील, मंजुळा पाटील, मयुरी तांडेल, प्राजक्ता तांडेल, पुष्पलता पाटील, यशवंत ठाकूर आदी उपस्थित होते.या सर्वांनी जनावरांना, पशु पक्षांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.

कुपया चारा , चपाती,पक्षासाठी दाणे , पाणी टाकताणा त्या परीसरात ठेवण्यात आलेल्या भांड्यामध्ये टाकण्याची कृपया करावी. जेणे करून अन्न मातीत पडुन खराब व सुकनार नाही. जनावरांना खाण्याजोगी राहील.असे आवाहन द्रोणागिरी सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्था बोकडविरा तर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

Comments are closed.