https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

कोकण रेल्वे मार्गावरील आणखी एक एक्सप्रेस नव्या रंगरूपात धावणार!

0 33,210

रत्नागिरी : भारतीय रेल्वेने जुन्या गाड्यांच्या ठिकाणी एलएचबी तंत्रज्ञानाने बनवलेल्या नवीन गाड्या देशभरातील सर्वच रेल्वे मार्गांवर चालवण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यानुसार कोकण रेल्वे मार्गे धावणारी आणखी एक एक्सप्रेस गाडी आता नव्या रंगरूपात एलएचबी रेकसह धावणार आहे.

कोकण रेल्वे मार्गे धावणारी पोरबंदर ते कोचुवेली (20910/20909) ही गाडी आतापर्यंत आय आर एस रेकसह धावत होती. मात्र आता ती नवीन एल एच बी तंत्रज्ञानाने बनवलेली अत्याधुनिक बनणार आहे. एल एच बी श्रेणीतील ही गाडी दिनांक 28 मार्च 2024 च्या फेरीपासून प्रत्यक्ष धावू लागणार आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पोरबंदर ते कोचुवेली या मार्गावर दिनांक 28 मार्चपासून तर कोचुवेली ते पोरबंदर या प्रवासात ती दि. 31 मार्च 2024 च्या फेरीपासून एल एच बी. रेकसह धावणार आहे. जुन्या आय आर एस रेक सह धावताना ही गाडी 23 डब्यांची होती. मात्र नव्या रूंगरूपात म्हणजे एलएचबी रेकसह धावताना ती 22 डब्यांची होणार आहे.

अशी असेल डब्यांची रचना

नव्या रंगरूपातील गाडीला वातानुकूलित टू टायरचे 2, वातानुकूलित थ्री टायरचे 6, स्लीपर श्रेणीचे 8, जनरलचे तीन, एक पॅन्ट्री कार व एस एल आरचा प्रत्येकी एक डबा व जनरेटर कार याप्रमाणे एकूण 22 डबे या गाडीला असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.