https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

गाळाने भरलेले कोयना धरण घेणार मोकळा श्वास!

0 30,918

सातारा : गाळाने भरलेला कोयना धरणाचा जलाशय लवकरच मोकळा श्वास घेणार आहे. कोयना धरणातील गाळ उपशाचा प्रश्न मार्गी लागला असून नाम फाउंडेशन टाटा मोटर्सच्या मार्फत हे गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आले आहे.

दरे (जि.सातारा) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोयना धरणातील गाळ काढण्याच्या शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत टाटा मोटर्स आणि  नाम फाऊन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना धरण जलाशयातील गाळ काढण्यात येणार आहे.

यावेळी अभिनेते नाना पाटेकर, पालकमंत्री शंभूराज देसाई,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.