केळशीत शेकडो वर्षांपासून जपली जाणारी पलिते नाच परंपरा
पारंपरिक पद्धतीची नृत्य परंपरा रत्नागिरी जिल्ह्यात फक्त केळशीतच!
दापोली : तालुक्यातील केळशी गावात पलिते नृत्य परंपरा शेकडो वर्षांपासून आजही जपली जात आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात फक्त आणि फक्त केळशी गावातच ही नाच परंपरा आहे.
हा नाच गौरी पुजनच्या रात्री असतो. यामध्ये पुढील माणूस मशाल घेऊन असतो तर बाकीच्या लोकांच्या हातात पलीते असतात. हा नाच फक्त केळशी गावातच असतो. केळशी येथील जय हिंद आणि भंडारी समाजाचा हा नाच आहे. यामध्ये महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग असतो. नुकताच गौरी पुजानाला ही पर्वणी पाहण्याची संधी मिळाली.