कोकण श्रमिक संघाद्वारे आय.एम.सी.शी हा तिसरा करार
उरण (विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील आय एम सी लि. जेएनपीटी येथील कामगारांचा भरघोस पगार वाढीचा अभूतपूर्व असा करारनामा शनिवार दि. 7 मे 2022 रोजी करण्यात आला. कोरोना महामारी संपत आली आणि कामगारांना कोकण श्रमिक संघाद्वारे पगार वाढीची भेट देण्यात आली.कोकण श्रमिक संघाद्वारे आय.एम.सी. मध्ये हा तिसरा करार करण्यात आला आहे.
तसेच जेएनपीटी भागातील सर्वात जास्त पगारवाढीचा करारनामा करण्यात आला. दिवंगत पूर्व जनरल सेक्रेटरी गजानन थळे यांना या करारा द्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर करारा द्वारे – ग्रेट कामगारांना रुपये 12,500 पगारवाढ करण्यात आली. तर इ ग्रेट कामगारांना 11,500 पगारवाढ करण्यात आली. या कराराद्वारे प्रत्येक कामगाराला 50 हजार ते 55 हजार रुपये थकबाकी मिळणार आहे.कपंनी मध्ये या करारामुळे सर्व कामगारांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अन्य सुविधात देखील वाढ करण्यात आली आहे. बोनस, विमा संरक्षण, मुलांच्या शिक्षणा करिता भत्ता, घरभाडे व इतर सेवा सुविधा मिळणार आहेत.
हा करारनामा यशस्वी करण्यासाठी जेष्ठ दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांची कन्या व कोकण श्रमिक संघाचे जनरल सेक्रेटरी कु. श्रुती श्याम म्हात्रे, संघाचे अध्यक्ष संजय वढावकर, सेक्रेटरी एकनाथ ठोंबरे यांनी मार्गदर्शन व मेहनत घेतली.
कंपनीतर्फे व्ही एल एन राव-व्हॉइस प्रेसिडेंट, संजीव लेले जनरल मॅनेजर, सरतेज यादव डेप्युटी जनरल मॅनेजर, नेहरू सुब्रमनियम सिनिअर मॅनेजर व कामगार प्रतिनिधी म्हणून रविंद्र भोईर, धर्मेंद्र ठाकूर, सुरेंद्र ठाकूर, काशिनाथ ठाकूर, रविंद्र ठाकूर यांनी सदर करारावर स्वाक्षरी केल्या.