जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केली चिपळूणमधील गाळ उपशाची पाहणी
चिपळूण : शहरातून जाणाऱ्या वाशिष्टी शिव नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ पाटील यांनी यावेळी संबंधित विभागाला मान्सून पूर्वी जास्तीत जास्त मनुष्यबळ व यंत्रसामुग्री चा वापर करून गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार श्री.सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता बागेवाडी, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.