https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण

0 59

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचा उपक्रम

उरण दि.९ (विठ्ठल ममताबादे ) : श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे उरण तालुका मर्यादित पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा 2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत उरण तालुक्यातील उरण शहरामधील कोटनाका येथील राजे शिवाजी मित्र मंडळाला प्रथम क्रमांक, देऊळवाडी येथील देऊळवाडी युवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दुसरा क्रमांक तर कामठा येथील जय शिवराय मित्र मंडळाच्या गणेशोत्सवला तिसरा क्रमाकांने गौरविण्यात आले.

घरगुती स्पर्धेत कळंबुसरे येथील क्षितिज म्हात्रे यांना प्रथम क्रमांक, कोप्रोली येथील सचिन म्हात्रे यांना द्वितीय क्रमांक,शैलेश म्हात्रे खोपटे यांना तृतीय तर, परेश घरत जासई, प्रेमकुमार म्हात्रे गोवठणे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

विजयी सर्व घरगुती स्पर्धकांना व सार्वजनिक विजयी गणेशोत्सव मंडळांना शाल, गुलाब पुष्प, सन्मानचिन्ह देऊन बक्षीसांचे वितरण करण्यात आले. संबंधित सर्व स्पर्धकांनी व उरण मधील गणेशोत्सव मंडळांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेचे कौतूक करत संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे आभार मानले आहेत. पर्यावरण पूरक स्पर्धा राबविणारे उरण तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था ही एकमेव सामाजिक संस्था आहे. पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, पर्यावरणा विषयी जनजागृती व्हावे या उद्देशातून ही स्पर्धा राबविल्याचे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांनी सांगितले. पर्यावरण पूरक स्पर्धेची माहिती व श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे कार्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी भेटी दिलेल्या घरगुती गणेशोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिली. यावेळी अध्यक्ष सुदेश पाटील , कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे , सहसचिव अभय पाटील, सहसंपर्कप्रमुख सादिक शेख, खोपटे गाव अध्यक्ष सागर घरत, सदस्य नितेश पवार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.