बेळगाव-मिरज -सांगली मार्गे धावणारी एर्नाकुलम पुणे एक्सप्रेस कोकण रेल्वेमार्गे धावणार !
रत्नागिरी : रेल्वे मार्गावरील अपग्रेडेशनच्या कामामुळे बेळगाव- मिरज -सांगली मार्गे धावणाऱ्या एर्नाकुलम पुणे एक्सप्रेसच्या दोन फेऱ्या कोकण रेल्वे मार्गे होणार आहेत.
दक्षिण- पश्चिम रेल्वे मार्गावरील हुबळी डिव्हिजनमध्ये रेल्वे मार्गावर अपग्रेडेशनचे काम सुरू आहे. या कामासाठी या मार्गावरून जाणारी एर्नाकुलम- पुणे एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार दिनांक 20 तसेच 27 जून २०२२ रोजी धावणारी एरणाकुलम पुणे एक्सप्रेस बेळगाव- मिरज- सांगली मार्गे धावणण्या ऐवजी मडगाव- रत्नागिरी -रोहा – पनवेल कर्जत मार्गे पुण्याला जाणार आहे. 11098 या क्रमांकाने धावणारी एर्नाकुलम- पुणे एक्सप्रेस सांगली मार्गा ऐवजी कोकण रेल्वे मार्ग धावणार आहे. हा बदल तात्पुरत्या स्वरूपात आहे. या गाडीने दिनांक 20 तसेच 27 जून रोजी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.