भारतीय मजदूर संघाची पश्चिम क्षेत्र नागपूर बैठक संपन्न
उरण (विठ्ठल ममताबादे ): भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र, विदर्भ आणि गोवा पश्चिम क्षेत्र बैठक 25 व 26 जून रोजी नागपूर येथे हॉटेल राहुल रेसिडेन्सी इथे संपन्न झाली. या बैठकीला भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हिरण्यम पंड्या, राष्ट्रीय उपअध्यक्ष श्रीम. नीता चौबे, राष्ट्रीय मंत्री रवींद्र हिम्मे, राष्ट्रीय मंत्री श्रीम. निलिमा चिमुटे, राष्ट्रीय नेते अण्णा धुमाळ, पोर्ट महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, महाराष्ट्र राज्याचे महामंत्री मोहन एनुरे, तिन्ही प्रांताचे महामंत्री व महासंघाचे महामंत्री उपस्थित होते.
या बैठकीत भारतीय मजदूर संघाच्या तिन्ही प्रांताच्या व महासंघाच्या कार्याचा आढावा, कार्य विस्तार, आगामी कार्यक्रम, आंदोलने यावर चर्चा झाली. नुकत्याच जिनेव्हा येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेतील घडामोडींवर चर्चा करण्यात आली.या बैठकीचे आयोजन पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय संघटन मंत्री सी. व्ही. राजेश यांनी केले होते.