मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांचे नाव द्यावे
मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील तसेच रत्नागिरी येथील तहसीलदार श्रीम. मणचेकर यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी यांच्यामार्फत या बाबत शासनाकडे मागणी करणारे निवेदन मराठी पत्रकार परिषदेच्या रत्नागिरीतील एका शिष्टमंडळाने दिले. गेल्या काही वर्षापासून काम युद्धपातळीवर सुरु असलेला मुंबई -गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्ग लवकरच खुला होणार आहे. महामार्गाचे रखडलेले काम दिवसरात्र अत्याधुनिक मशिनरीच्या मदतीने पूर्ण केले जात आहे.
रायगडमध्ये बरीच वर्षे राखडलेले हे काम सुरु होण्यासाठी पत्रकार संघटना रस्त्यावर उतरली होती.
या महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव द्यावे, या मागणीसाठी निवेदन देताना मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.