राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार २०२२ प्रस्तावांसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत
रत्नागिरी : भारतीय बाल कल्याण परिषद, नवी दिल्ली यांचे वतीने १९५७ पासुन सहा ते अठरा वयोगटातील मुला/मुलीनी दुसऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी अथवा अपघात टाळण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालुन अथवा प्रसंगावधान दाखवुन अतुलनिय साहस/धाडस दाखविल्याबद्दल शौर्य पुरस्कार दिला जातो. अशा पुरस्कार प्राप्त मुलांना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी केले जाते.
सदर पुरस्काराची नियमावली व विहीत अर्जाचा नमुना तसेच योजनेची माहिती शासनाची व इंडीयन कॉन्सील फॉर चाईल्ड वेल्फेअर नवी दिल्ली यांचे www.iccw.co.in या वेवसाईटवर उपलब्ध आहे. सदर प्रस्ताव पाठविताना खालील बाबींची पुर्तता करुन प्रस्ताव संकेतस्थळावर भरण्यात यावेत. मुलाचे वय ०६ ते १८ वर्ष या दरम्यानचे असावे. घटनेचा कालावधी १ जुलै २०२१ ते ३० सप्टेंबर २०२२ हा असावा. अर्जासोबत पोलिसांच्या एफ. आय. आर. ची प्रत पोलिस डायरी व वृत्तपत्रांचे कात्रण इत्यादी जोडणे आवश्यक
आहे.
मुलाच्या वयाच्या दाखल्याची छायांकीत प्रत जोडण्यात यावी. प्रस्तावासोबत दोन सक्षम प्राधिकाऱ्यांच्या शिफारशी (जिल्हाधिकारी / जिल्हा पोलिस अधिक्षक व इतर तत्सम ) प्रस्तावाबाबतची सविस्तर माहिती व विहीत नमुना अर्ज इंडीयन कॉन्सील फॉर चाईल्ड वेल्फेअर नवी दिल्ली यांचे वेबसाईटवर www.iccw.co.in उपलब्ध असून प्रस्ताव ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर 2022 आहे असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रत्नागिरी यांनी कळविले आहे.