समाजकल्याण कार्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा
रत्नागिरी : २६ जून २०२२ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन कार्यक्रम सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव, रत्नागिरी येथे संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास प्रमुख्य व्याख्याते म्हणून पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरीच्या श्रीमती योगिनी भागवत यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन चरित्रावर मोलाचे मार्गदशन केले. तसेच सदर कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी संतोष चिकणे, व सहा.लेखाधिकारी, समाज कल्याण कार्यालय, रत्नागिरी डी. डी.केळकर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन संकुलातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.