स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेचा ठेववृध्दी मास सुरु
रत्नागिरी : 24 वर्षांपेक्षा अधिक वर्षाची परंपरा असलेला स्वामी स्वरॠपानंद पतसंस्थेचा 20 जुन ते 20 जुलै हा ठेव वृद्धी सुरु होत असुन या निमित्ताने संस्थेने यामध्ये 12 ते 18 महिनेची मुदतीची स्वरॠपांजली ठेव योजनेमध्ये सर्वसाधारण 6.75 टक्के व महिला / ज्येष्ठनागरीक यांचेसाठी 7.00 टक्के व तसेच ग्राहकांसाठी 19 ते 60 महिने मुदतीच्या सोहम ठेव योजनेमध्ये सर्वसाधारण 7.00 टक्के व महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 7.25 टक्के एवढा व्याजदर देऊ केला आहे तरी या आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
दि. 18 जुन 2022 अखेर संस्थेच्या ठेवी 251 कोटी 78 लाख झाल्या असून कर्जे 169 कोटी 78 लाख एवढी झाली आहेत. संस्थेची गुंतवणूक 124 कोटी 34 लाख असून संस्थेचा स्वनिधी 31 कोटी 87 लाख असा आहे. संस्था आर्थिक दृष्ट्या भक्कम पायावर उभी असून जमा होणार्या रकमेचे काटेकोर नियोजन संस्था करीत असते. संस्थेच्या रत्नागिरी तालुक्यामध्ये सध्या रत्नागिरी शहर व मारुतीमंदीर, कोकणनगर, कुवारबाव तसेच पावस, जाकादेवी, खंडाळा, पाली, मालगुंड अशा शाखा असुन तालुक्याबाहेर चिपळूण, साखरपा, देवरुख, नाटे, लांजा, राजापूर व पुण्यामध्ये कोथरुड तसेच देवगड जामसंडे येथे शाखा कार्यरत आहेत. या सर्व शाखांमध्ये या ठेव योजनांचा लाभ ग्राहकांना मिळणार असून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत यानिमित्ताने पोहोचण्याचे नियोजन संस्थेने केले आहे अशी माहितीही संस्थेचे अध्यक्ष अॅड. पटवर्धन यांनी दिली आहे .
या ठेववृध्दीमासात मोठ्या प्रमाणावर संस्थेच्या ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन ड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे. आज वरची संस्थेची विश्वासार्हता व उत्तम ग्राहक सेवा, ठेवीदारांचा संस्थेप्रती असलेला स्नेहभाव व संस्थेची उत्तम आर्थिक स्थिती या बळावर 10 कोटींपेक्षा अधिक ठेवी या ठेववृध्दीमासात जमा होतील असा विश्वास ड दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.