अहमदपूर येथे १० रोजी राष्ट्रसंत सदगुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज समाधी मंदिर बांधकामाचे भूमिपूजन व संजीवन समाधी सोहळा
उरण दि. 3 ( विठ्ठल ममताबादे ) : वीरशैव – लिंगायत समाजातील गुरुवर्य, वीरशैव लिंगायत समाजाचे आधारस्तंभ,राष्ट्रसंत ,वसुंधरारत्न , सदगुरु कै. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त शनिवार दि 10 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12:30 वा. – श्री क्षेत्र भक्तीस्थळ नांदेड रोड, अहमदपूर, जिल्हा लातूर येथे राष्ट्रसंत सदगुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे समाज मंदिर बांधकामाचे भूमीपूजन व समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री राजशेखर गुरुशिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली व शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला केंद्रिय परिवहन भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रिय वित्त राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रिय रसायन व खते राज्यमंत्री भगवंत खूब्बा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
श्री क्षेत्र भक्तीस्थळ अहमदपूर, जिल्हा लातूर येथे 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2022 दरम्यान अखंड शिवनाम सप्ताहाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. दि 10 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9 वा.गुरुवर्यांचा पालखी उत्सव, सकाळी 10 ते 12 प्रसादावरील किर्तन, दुपारी 12:30 वा मान्यवरांच्या शुभहस्ते भूमी पूजन सोहळा व दुपारी 1 ते 3 धर्मसभा असे 10 सप्टेंबर 2022 रोजी कार्यक्रम असून अनेक शिवाचार्य , गुरुवर्यांच्या सानिध्यात हा सोहळा संपन होणार असून या कार्यक्रमाला शिवा संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, भाविक भक्तांनी, वीरशैव – लिंगायत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी केले आहे.