आंबोलीत साकारणार ‘आंबोली बायोडायव्हर्सिटी सेंटर’
आंबोली टुरिझमचे निर्णय राऊत यांची माहिती
आंबोली (सिंधुदुर्ग ) : जगाच्या नकाश्यावर आंबोलीला एका क्लिकवर ‘आंबोली टुरिझम’मार्फत निर्णय राऊत या युवकाने उपलब्ध करत तेथे बारमाही विविध पर्यटन सेवा सुरू केल्या.त्यानंतर आता आंबोली परिसरातील महत्वपूर्ण जैवविविधता पाहता त्याचे संवर्धनासाठी तसेच सर्व निसर्गप्रेमी, अभ्यासक आदी सर्वांसाठी पहिलेच आंबोली टुरिझम मार्फत लवकरच आगळे – वेगळे असे पहिलेच “आंबोली बायोडायव्हर्सिटी सेंटर” सुरू करण्यात येणार आहे.
हे आंबोली बायोडायव्हर्सिटी सेंटर’ सर्वांसाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती आंबोली टुरिझमचे निर्णय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे असंख्य निसर्गप्रेमी व अभ्यासक यांना आंबोली परिसरातील जैवविविधतेची पर्वर्णीच मिळणार आहे. तसेच ‘आंबोली बायोडायव्हर्सिटी सेंटर’ हे कोकणातील तसेच पश्चिम घाटातील पहिलाच उपक्रम ठरण्याची शक्यता!
निर्णय राऊत आपल्या आंबोली परिसराला जागतिक स्तरावर विविध प्रकारे येथील पर्यटनासह इतर निसर्गाची देणगी लाभलेल्या आंबोली परिसराला अनन्य महत्वाने वेगळीच ओळख निर्माण व्हावी तसेच १२ महीने सर्व प्रकारच्या पर्यटनसह निसर्ग अभ्यासक व आदी यांना आंबोली परिसरात सर्व काही उपलब्ध व्हावे यासाठी नेहमीच धडपड करताना पाहू शकतो. निर्णय राऊत याने आंबोली टुरिझम मार्फत आंबोलीत बाराही महीने पर्यटन होते हेही सिद्ध केले असून साहसी पर्यटन, वाईल्ड लाईफ, सफारी, टेंट कॅम्पिंग, नेचर इवेंट्स व आदिंचा यशस्वी पाया रोवला. तर गत वर्षी कोरोनामुळे पर्यटन बंद असल्याने आंबोली टुरिझम लाईव्ह संकल्पना राबवत वर्षा पर्यटन असंख्य पर्यटकांना आंबोली टुरिझम वेबसाईट , सोशल मीडिया मार्फत आंबोली दर्शन घडवून आणले होते.
पश्चिम घाटातील जैवविविधतेने परिपूर्ण असलेले तसेच पश्चिम घाटातील जैवविविधतेत आंबोली परिसर हा सर्वात महत्वाचा समजला जातो. नेहमी येथे दुर्मिळ तसेच अतिदुर्मिळ जैवविविधतेतील घटक आंबोली परिसरात आढळत असून येथे जैवविविधतेतील घटक आहेत. तर आंबोली परिसरात गेली काही वर्षे येथील जैवविविधताला निसर्गप्रेमी यांची पसंती पाहता आंबोली परिसरातील जैवविविधता तथा परिसरातील गावांचे हित सुरक्षित राहावे यासाठी जैवविविधता संवर्धनसह अवैध प्रकार टाळण्यासाठी सोबत येथील जैविविधता सर्वांना खुली करण्यासाठी विशेष पहिलेच आंबोली टुरिझम मार्फत ‘आंबोली बायोडायव्हर्सिटी सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. या ‘आंबोली बायोडाव्हर्सिटी सेंटर’ सुरू करण्यासाठी गेली ३ वर्ष प्रयत्न निर्णय राऊत यांचे चालु होते. मात्र, २०१९ च्या अतिवृष्टीमुळे १ वर्ष तर कोरोना महामारीमुळे २ वर्ष सदर सेंटरला विलंब झाला होता. परंतु, आता आंबोली बायोडाव्हर्सिटी सेंटर लवकरच काही महिन्यात सुरू होणार असून टप्या – टप्प्याने त्यातील अनेक बाबी खुले केले जातील. या आंबोली बायोडाव्हर्सिटी सेंटर मधे आंबोली जैवविविधतेतिल हर एक घटक तेही त्यावह महत्वाने विविध पद्धतीने सखोलपणे सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. “आंबोली बायोडाव्हर्सिटी सेंटर” द्वारे आंबोली परिसरातील जैवविविधतेत नव नवीन संशोधन, संवर्धन करत तसेच जनजागृती सुद्धा केली जाणार असून आंबोली परिसरातील जैवविविधतेत आढळणाऱ्या तसेच नव नवीन शोध लागलेल्या सर्व घटकांची नोंद अधिकृत रित्या केली जाणार आहे. जी सर्वांसाठी खुली असणार आहे. आणि बरच काही… तर यासाठी सर्व निस्वार्थी निसर्गप्रेमि तथा अभ्यासकांचे सहकार्य देखील लागणार असून सहकार्य करणाऱ्या निसर्गप्रेमी तथा अभ्यासक यांना पुढे येण्याचेही आवाहन निर्णय राऊत यांनी केलेले आहे.
दरम्यान, आंबोली परिसरातील जैवविविधतेत उल्लेखनीय काम कारणाऱ्या अभ्यासकांसह निसर्गप्रेमीचेही येथे कामगिरीलाही स्थान देण्यात येणार आहे. असेही निर्णय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. तर आंबोली टुरिझम मार्फत सुरू होणाऱ्या “आंबोली बायोडाव्हर्सिटी सेंटर” साठी अनेकांनी एक आंबोलीच्या पर्यटन विकासात तसेच नैसर्गिक महत्वात मोलाचे पाऊल ठरेल, असे उद्गार काढत निर्णय राऊत आणि त्यांच्या टीम’ला “आंबोली बायोडाव्हर्सिटी सेंटर” साठी शुभेच्छाही देत आहेत.