आगरवायंगणी येथील प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
दापोली (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यात आगरवायांगणी कृषी महाविद्यालय दापोली येथील ‘कृषीकन्या’ या विद्यार्थिनींच्या गटामार्फत ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्य्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून पू. प्रा.केंद्रशाळा आगरवायंगणी येथे योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
आगर वयांगणी येथील या शाळेत आयोजित केलेल्या योग शिबिरात विद्यार्थ्यांना योगाचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले व अभ्यास करतेवेळी सुद्धा एकाग्रता वाढवण्यासाठी योग आपल्याला कशाप्रकारे फायदेशीर ठरतो याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी गटातील विद्यार्थिनी संस्कृती गावडे, संजना सावंत,अंजना, रिया व निवेदिता दासरी यांनी योगासनांची विविध प्रात्यक्षिके शाळेतील विद्यार्थांना करून दाखवली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.टिमसेकर, व इतर सहायक शिक्षक येथे उपस्थित होते.योगाद्वारे आपण आपले शरीर, मन यावर ताबा ठेवू शकतो व आपले जीवन सुखकारक करू शकतो असा संदेश शाळेचे शिक्षक श्री.कदम यांनी मुलांना दिला.
विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या विविध उपक्रमांची चित्रफीत यावेळी सर्वांना दाखवली. व अशाप्रकारे शिक्षिका सौ.जोशी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.