आषाढी एकादशी- बकरी ईद साजरी करीत आंबेड शाळेत धार्मिक एक्याचे दर्शन!
न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अनोखा उपक्रम
शाळेच्या या उपक्रमातून हिंदू -मुस्लिम ऐक्याचे दर्शन
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेड बु. या शाळेतील हिंदू मुस्लिम विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनी एकत्र येऊन शाळेमध्ये आषाढी एकादशी आणि बकरी ईद कार्यक्रम साजरा करते हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवून आणले.
नवनिर्मिती फाउंडेशन उक्षी संचलित न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेड बु. या शाळेच्या विविध उपक्रमांतर्गत हा एक आगळा वेगळा उपक्रम आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकत्रित साजरा करण्यात आली या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व धर्म समभाव हे मूल्य रुजवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना दोन्ही सणांची माहिती सुद्धा देण्यात आली.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायातील वेशभूषा आणि ईदीसाठी लागणारी वेशभूषा परिधान करून आज शाळेमध्ये आनंदोत्सव साजरा केला. हिंदू मुस्लिम विद्यार्थी एकत्रित येऊन दिंडी काढण्यात आली तर वारकरीची वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज, मुख्याध्यापिका नाझिमा बांगी, सिमरन मालदार, नगमा अलजी, बुशरा अलजी, सारा फकीर, सानिका मोहिते या शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.