उरण महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा
उरण (विठ्ठल ममताबादे ): कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बळीराम एन. गायकवाड यांनी योगा हि एक दिवस करण्याची प्रक्रिया नसून दररोज योगा केला पाहिजे असे सांगितले.कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक पूनम चव्हाण (योगा प्रशिक्षक) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगा ही जीवन जगण्याची कला असून नियमित योगाभ्यास केला तर आपण दुःख मुक्त व निरोगी होतो असे सांगितले व यम-नियम प्राणायाम, ध्यानधारणा इत्यादी विषयी सविस्तर माहिती सांगितली तसेच प्राणायामाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना शिकवले. ज्येष्ठ प्राध्यापक के.ए.शामा सर यांनी तरुण वयात योगा करण्याची सवय लागली तर जीवन आनंदी आणि प्रसन्न होईल त्यासाठी योगाभ्यास करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. एम.जी. लोने यांनी केले. सूत्रसंचालन एन. एस. एस. प्रमुख प्रा. डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. एच.के. जगताप यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.