नवी दिल्ली : देशात पुढील दिनांक १ ऑक्टोबरपासून 5ग सेवेचा शुभारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ केला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने ट्विट करून ही माहिती दिली आहे. यामुळे देशभरात वेगवान इंटरनेट सेवेचे पर्व सुरू होणार आहे. भारतातील डिजिटल क्रांतीला नवीन उंचीवर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. दिनांक 1 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाईल काँग्रेसमध्येही सेवा लॉन्च होणार आहे.
मागील काही वर्षांपासून भारतीय ग्राहक 5G सेवेच्या प्रतीक्षेत आहे. ग्राहकांची ही प्रशिक्षण पुढील आठवड्यात संपणार आहे.