कंटेनरची धडक बसून जमखारचा रहिवासी असलेल्या निष्पाप नागरिकाचा बळी
.
उरण दि १७( विठ्ठल ममताबादे ): शुक्रवार १७ जून रोजी दुपारच्या सुमारास जे एन पी टी कंटेनर ट्रेलर वाहनतळ (पार्किंग प्लाजा) येथे सुरक्षिततेच्या अभावा मुळे एका कंटेनर ट्रेलरने तेथे काम करीत असलेल्या बालू महादेव गुलिक या ट्रांसपोर्ट सुपरवाइजरला धड़क दिल्याने त्याचा जागेवरच मृत्यु झाला आहे.त्या पार्किंग प्लाजा येथे हजारो गाड्या मधून करोड़ो रूपये उत्पन्न मिळत आहे. करोडो रुपये उत्पन्न घेऊन देखील येथील कर्मचाऱ्यांना कोणत्याही वैद्यकीय सुविधा, सुरक्षीतता नाही. सेवा सुविधेच्या साधना अभावामुळे सदर निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. सदर दुर्घटना शुभ लाभ ट्रांसपोर्ट च्या कंपनीने केली आहे. म्हणुन त्या दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला आर्थिक व भरिव सहाय्य मिळावे व त्यांना न्याय मिळावा व जे एन पी टी व तत्सम ट्रांसपोर्ट कंपनी वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठि युवा सामाजिक संस्था जसखार यांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. सदर मृत्युमुखी व्यक्तीला न्याय मिळवून देणार असे अमित ठाकुर सदस्य -युवा सामाजिक संस्था जसखार यांनी यावेळी सांगितले.