कडवई जिल्हा परीषद गटात शिवसंपर्क अभियान
शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
संगमेश्वर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे राज्यामध्ये शिवसंपर्क अभियानाची सुरुवात झाली असून रत्नागिरी -सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कडवई जिल्हा परिषद गटामध्ये स्थानिक लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष प्रितम शिंदे व चिटणीस सिद्धेश शिरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंपर्क अभियान नुकतेच पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलन ,शिवप्रतिमा पूजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिवसैनिकांचे दैवत हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या नंतर सर्व मान्यवरांचे जिल्हा परिषद गट कडवईच्या वतीने स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख व सभापती कृष्णा हरेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून आपली भूमिका मांडली. या नंतर कडवई जिल्हा परिषद गटाचे जि. प. सदस्य व रत्नागिरी जि. प. अध्यक्ष संतोष थेराडे यांनी मनोगतात पाच वर्ष केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला व शिवसैनिकांचे लाभणारे सहकार्य व प्रेम याबद्दल सर्व शिवसैनिकांना धन्यवाद दिले.
शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांनी संतोष थेराडे यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यानंतर सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी स्थानिक लोकाधिकार समितीचे महत्त्व स्पष्ट करत संतोष थेराडे यांच्या कामाचा आढावा घेत त्यांचे कौतुक केले. या नंतर माजी आमदार सुभाष बने यांनी संतोष थेराडे यांच्या कार्याचा आढावा घेत कामाची पद्धत, प्रशासनाचा अभ्यास, कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याची पद्धत, कार्यकर्त्यांकडून मिळणारे प्रेम याबद्दल समाधान व्यक्त केले.
या वेळी ज्येष्ठ शिवसैनिक, सरपंच प्रतिनिधी, शाखाप्रमुख प्रतिनिधी,विभाग प्रमुख प्रतिनिधी, गाव प्रतिनिधी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी आमदार सुभाष बने, शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जि. प. अध्यक्ष रोहन बने, तालुकाप्रमुख प्रमोदजी पवार,जिल्हा महिला संघटक वेदा फडके, स्मिता लाड, मा. सभापती बंड्याशेठ बोरूकर, उपसभापती प्रेरणाताई कानाल, कडवई सरपंच विशाखाताई कुवळेकर, कडवई विभाग प्रमुख अनंत उजगावकर, उपविभागप्रमुख अरविंद जाधव,दिलीप सुर्वे, दता लाखण,कडवई युवा सेना प्रमुख अजिंक्य ब्रीद, विजय कुवळेकर, प्रभाकर हरेकर प्रदीप चोगले आदींनी उपस्थिती नोंदवली. शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नीलेश कुंभार यांनी केले.