कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार
उरण दि 2(विठ्ठल ममताबादे ): कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन खोपटे भागशाळा इयत्ता 10 विच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला.तसेच 100%निकाल लागल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी खोपटे गावातील ग्रामपंचायत विद्यमान सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, उपसरपंच सुजित म्हात्रे,सदस्य भावना पाटील, राजश्री पाटील, खोपटे गावचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, धुतम गावचे ग्रामपंचायत उपसरपंच शरद ठाकूर, हायस्कूल कमिटी चेअरमन राजन पाटील तसेच सर्व सदस्य शिक्षकवृंद तसेच खोपटे गावातील सर्व मान्यवर यांच्यासह 10 वीचे विद्यार्थी उपस्थित होते. ह्या सर्वांचे हायस्कूल कमिटीतर्फे आभार मानण्यात आले.