कोकणची पोरं हुश्शार!
दहावीतही मुलींची बाजी कोकण बोर्डाचा निकाल सर्वाधिक ९९.२७ टक्के
रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा ऑनलाइन निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल 96.94 टक्के लागला असून बारावीप्रमाणेच दहावीच्या परिक्षेतही मुलींनीच बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के लागला तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला म्हणजेच 95. 90 टक्के लागला आहे.
नऊ विभागीय मंडळातून एकूण 15 लाख 84 हजार 790 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 15 लाख 21 हजार 03 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 6 लाख 50 हजार 779 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. 5 लाख 70 हजार 27 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. 12210 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर 29 शाळांचा निकाल 0 टक्के लागला आहे.