कोकण रेल्वे मार्गावर उद्या धावणार वन वे डबल डेकर एक्स्प्रेस
कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेडला थांबणार
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी मडगाव ते मुंबईतील लो. टिळक टर्मिनस दरम्यान दि. १० जून २०२२ रोजी वातानूकुल्लित वन वे डबल डेकर एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
या बाबत कोकण रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्र. 01100 मडगाव ते लोकमान्य टिळक (टी) वन वे स्पेशल मडगाव जंक्शन येथून शुक्रवार, 10 जून 2022 रोजी 12.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 23:45 वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
ही गाडी गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबणार आहे.
या गाडीला एकूण 12 एलएचबी कोच असतील. त्यात. 2 टायर एसी – 02 कोच, 3 टायर एसी – 04 कोच, एसी चेअर कार (डबल डेकर) – 04 कोच तसेच् जनरेटर कार – 02 असे डबे जोडण्यात येणार आहेत.
या वन वे स्पेशल ट्रेनचे बुकिंग सर्व पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (पीआरएस) काउंटर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर बुकिंगसाठी खुले असल्याचे कोकण रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.