खेडनजीक ‘द बर्निंग कार’चा थरार
वेळीच उतरल्याने चालक बचावला
खेड : खेड तालुक्यामधील खेडहुन खोपीकडे जाणाऱ्या मार्गावर धावती इको कार अचानक पेटली. यावेळी चालक प्रसंगावधान राखून वेळीच कारमधून बाहेर पडल्याने बचावला आहे. रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली.
तिसंगी गावानजीक रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खेडहून तिसंगी गावाकडे जाणारी मारुती इको कारने ने अचानक पेट घेतला. यामध्ये मोटर जळून खाक झाली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.ही कार सीएन जी वर चालणारी होती अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.