गणपती स्पेशल गाड्यांना झाराप, मडुरे स्थानकांवर अतिरिक्त थांबे
कोकणात गणपतीसाठी येणाऱ्या प्रवाशांना दिलासा
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाड्यांचे थांबे वाढविण्यात आले आहेत.
या संदर्भात कोकण रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी ( 01137/01138) सिंधुदुर्गातील झाराप स्टेशनवर देखील थांबा देण्यात आला आहे.
मुंबईहून येताना ही गाडी झारापला दुपारी 12.03 मिनिटांनी येईल आणि बारा वाजून पाच मिनिटांनी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल
परतीच्या प्रवासात ही गाडी झरा स्टेशनवर दुपारी दोन वाजून 50 मिनिटांनी येईल आणि दोन मिनिटांनी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.
या गाडीबरोबरच पुणे ते थिविम- पनवेल( 01145/01144 या गणपती स्पेशल गाडीला देखील कोकण रेल्वे मार्गावर सिंधुदुर्गमध्ये मडूरे स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. पुणे ते थीवीम या मार्गावर धावताना ही गाडी शनिवारी सकाळी 8 वा. मिनिटांनी मडुरे स्थानकावर आणि दोन मिनिटांनी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल. परतीच्या प्रवासात ही गाडी पनवेलपर्यंत धावणार आहे. ही गाडी नव्याने देण्यात आलेल्या मडु रे स्थानकावर दुपारी तीन वाजता येईल आणि दोन मिनिटांच्या थांब्यानंतर पनवेलसाठी रवाना होईल.