‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाबाबत रत्नागिरीत जनजागृती फेरी
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहुन देशभक्तीची भावना कायमस्वरूपी मनात रहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत देशभरात “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी यांच्यातर्फे आज ( दि.27 जुलै 2022 रोजी) जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथून ते आर.टी.ओ. ऑफिस पर्यंत मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल यांच्या वाहनांची जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.
या रॅलीचे उद्धाटन डॉ. बी.एन. पाटील, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, पोलीस निरीक्षक शिरीष सासणे आदी मान्यंवर उपस्थित होते.