घारापुरी येथे महापंचायतराज अभियानांतर्गत विविध कार्यक्रम
उरण (विठ्ठल ममताबादे ) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त पंचायत समिती उरण व ग्रामपंचायत घारापूरी यांच्या संयुक्त विद्यमाने महापंचायत राज अभियानांतर्गत उरण तालुक्यातील घारापुरी ग्रामपंचायत येथे विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
वारस नोंदी करणे, पती पत्नी यांची संयुक्तपणे घरांना नावे लावणे, ई श्रम कार्ड काढणे, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना नोंद करणे, जनधन योजना खाते उघडणे, आरोग्य तपासणी शिबीर आदी कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले. यावेळी या सर्वच कार्यक्रमांना नागरिकांचा, जनतेचा खूप मोठा उत्तम प्रतिसाद लाभला. यावेळी घारापुरी ग्रामपंचायतचे सरपंच बळीराम ठाकूर व सदस्या ज्योती कोळी,सुभद्रा शेवेकर, ग्रामसेवक पवित्र कडु, डॉ.महेंद्र धादवड वैद्यकीय अधिकारी, डॉ.अमृता जोशी, एस.एस.घाडगे आरोग्य निरिक्षक, सुनील सैदाने आरोग्य निरीक्षक, श्रीमती एजी पाटील आरोग्य सेविका, श्रीमती कामीनी धडेवाड,एन.जे.झावरे आरोग्य सेवक, कल्पना कोळी आशा सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.