‘चाईल्ड केअर’तफे आदिवासी शाळेत वस्तू वाटप
उरण दि 15(विठ्ठल ममताबादे ) : चाईल्ड केअर सामाजिक संस्थेतर्फे 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त वेश्वी आदिवासी शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन
चाईल्ड केअर संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विकास कडू यांच्या मार्गदर्शनाखाली वेश्वी आदिवासी शाळेत साजरा करण्यात आले.
शाळेसाठी पंखे स्वच्छताचे सर्व सामान,शिक्षकांना लागणारे सामान, मुलांना शैक्षणिक साहित्य आणी खाऊ वाटप करण्यात आले.तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील विविध श्रेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.सामाजिक क्षेत्रातील उल्लखनीय कार्या बद्दल समीर म्हात्रे (कळंबुसरे,
सामाजिक क्षेत्र), अभिनयाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे रोशन घरत (खोपटे अभिनेता),शिक्षण श्रेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे रमणिक म्हात्रे (शिक्षण श्रेत्र),
पत्रकार म्हणून विठ्ठल ममताबादे (पत्रकार),उरण तालुक्यात नृत्य दिगदर्शक म्हणून उत्तम कार्य करणारे रुपेश घरत(नवीन शेवा, नुत्य दिग्दर्शक),
युट्युब मधू उल्ल्खनीय कार्य करणारे कु.अनमोल कोळी (युट्युब अभिनेता) यांचा विशेष सम्मान 2022 हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
सदर कार्यक्रमास राजू मुंबईकर (महाराष्ट्र भूषण),विकास कडू (संस्थापक-अध्यक्ष), संदीप कातकरी (सरपंच वेश्वी ), कुणाल पाटील ( उपाध्यक्ष वाहतूक सेना उरण ),मनोज ठाकूर(संस्था, उपाध्यक्ष), विठ्ठल ममताबादे (पत्रकार) समीर म्हात्रे (सदस्य कळंबुसरे ), नरेद्र घरत ( सदस्य, यूट्यूब अभिनेते) राजेश ठाकूर (हिंदीआल्बमअभिनेते ),रोशन घरत (खोपटे), दिगंबर कोळी (नाट्य कर्मी),कु अनमोल कोळी (बेलपाडा),कु विवेक कडू (करळ)हे मान्य वर उपस्थित होते.तर शाळेच्या वतीने रमणिक म्हात्रे (मुख्याधापक), प्रतिभा ताईम्हात्रे (आंगण वाडी सेविका ),ज्योती कातकरी, व वेश्वी आदिवासी वाडीतील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.संस्थे चे गुणगाण करताना महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर म्हणाले कि ह्या संस्थेने आजवर जे आदिवासी वाड्या मध्ये जे जे कार्य केले आहे ते उल्लखनीय आहे.त्याबद्दल संस्थेचे संस्थापक विकास कडू आणी टीम चे करावे तितके कौतुक कमी आहे. त्यांना या(आदिवासी )लोकांचे आशीर्वाद नेहमी लागतील.शाळेचे मुखधापक रमणिक म्हात्रे यांनी आपल्या भाषणात विकास कडू हे उरण तालुक्याला मिळालेले एक ऊत्तम समाज सेवक आहेत. असे मनोगत व्यक्त केले.ते पुढे म्हणाले कि चाईल्ड केअर सामाजिक संस्थाचे सर्व सभासदाचे मी शाळेच्या वतीने आभार मानतो कि त्यांनी ही शाळेला मदत म्हणून जे काय साहित्य दिलेत त्या बद्दल आम्ही आभारी आहोत .कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांनी केले तर सूत्रसंचालन रमणिक म्हात्रे(शिक्षक )यांनी केले.आणी आभार प्रदर्शन कुणाल पाटील यांनी केले.