जागर तंबाखू मुक्तीचा
वशेणी येथे जागर तंबाखू मुक्तीचा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न
उरण (विठ्ठल ममताबादे ) : तंबाखूमुक्त समाजासाठी एक हात मदतीचा – जागर तंबाखूमूक्त समाजाचा हा संकल्प पूर्ण करण्या साठी धडपडणारे आणि नरोत्तम सक्सेरिया फाऊंडेशनचा तंबाखूमूक्तीचा दूत म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी लिहिलेल्या जागर तंबाखूमूक्तीचा या पुस्तकाचा उरण तालुक्यातील वशेणी गावात पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हा पुस्तक प्रकाशन सोहळा रायगड भूषण प्रा.एल बी पाटील, कोकणरत्न रविशेठ पाटील, उरण तालुक्याच्या सन्मा.सभापती समिधा निलेश म्हात्रे, साहित्यीक ए.डी.पाटील सर , अॅड.प्रसाद पाटील, काॅ.भूषण पाटील,वशेणी गावचे सरपंच जीवन गावंड,इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस गृप चे अध्यक्ष रमेश थवई,उरण पतपेढी संचालक शर्मिला गावंड,एस एस एस परिवाराचे समन्वयक संदीप पाटील,जेष्ठ साहित्यिक प्रकाश राजोपाध्ये सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका वंदना म्हात्रे,आय आय बी एम गृप च्या सिनिअर अकाउंट शिवानी पवार, खेरटकर परिवार समन्वयक अल्पेश खेरटकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या शानदार कार्यक्रमाचे आयोजन वशेणी इतिहास संपादकीय मंडळ, स्नेहबंध समूह उरण, इंडिया झिंदाबाद फ्रेण्ड्स गृप रायगड व एस .एस.एस मित्र परिवार महाराष्ट्र यांनी केले होते. स्वागताध्यक्ष समिधाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत सर्व उपस्थितीत मान्यवर साहित्यिक व स्नेही बंधू भगिनींचे नोटपॅड,पेन,पुष्पकुंडी, शाॅल व जागर तंबाखूमूक्तीचा नाम उल्लेख असणारा पेन देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या वेळी तंबाखूमूक्तीवर कवी भरत पाटील (कुंडेगाव)यांनी आगरी बोलीत कविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. सह्याद्री रत्न तथा शिव व्याख्याते धीरेद्र ठाकूर यांच्या धीरवाणीने अर्थात सुरेख सूत्रसंचालनाने कार्यक्रमाचे उंची अधिकच वाढली गेली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वि .रा. पाटील यांनी केले तर इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस गृपच्या महिला कार्यवाहक श्वेता राकेश पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत सादर केले. या वेळी एक हात मदतीचा .. संकल्प तंबाखूमूक्त समाजाचा या मोहिमेसाठी सर्वप्रथम मदतीचा हात पुढे करणा-या संगिता अनंत म्हात्रे यांना जिल्हा सरकारी वकील प्रसाद पाटील यांच्या शुभहस्ते जागर तंबाखूमूक्तीचा या पुस्तकाच्या दोन प्रती सप्रेम भेट म्हणून देण्यात आल्या. तद्नंतर सर्व उपस्थित मान्यवरांना पुस्तकाची एक एक प्रत सप्रेम भेट देण्यात आली. या प्रसंगी काॅ.भूषण पाटील, संदिप पाटील,सुधाकर पाटील, साहित्यिक ए डी पाटिल, विचार प्रवर्तक सुधीर पवार, अॅड.प्रसाद पाटील, कोकणरत्न रविशेठ पाटील आदि मान्यवरांनी आपापली मनोगते सादर केली. वशेणी गावातील मूर्तीकार देवानंद पाटील (पेंटर) यांनी यावेळेस स्वतःला तंबाखू पासून कसा त्रास झाला आणि यमाच्या दारातून कसा परत आलो याचा वृत्तांत सांगून गेली तीन महिन्या पासून मी तंबाखू सोडला आहे.या पुढे खाणार नाही, आणि कुटूंबाला तंबाखू पासून दूर ठेवीन असा संकल्प केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात रायगड भूषण प्रा.एल बी पाटील सर यांनी जागर तंबाखूमूक्तीचा हा विषय केवळ एकट्या मच्छिंद्र म्हात्रे चा नसून हा एक चळवळीचा विषय आहे. या चळवळीत आपण सा-यानीच जर समर्थन दिले तर एक दिवस मच्छिंद्र म्हात्रे यांच्या मनातील तंबाखूमूक्त समाजाचा संकल्प पूर्ण होईल. या पुस्तकाची जडण घडण, वैचारिकता, सामाजिक मूल्य पाहता महाराष्ट्राला सुध्दा या पुस्तकाची दखल घ्यावी लागेल. असे ही मत व्यक्त केले. कवि साहित्यिक हा चळवळ खोर असावा.समाजाचे प्रश्न आपल्या लेखणीतून मांडणारा असावा.आणि याच धाटणीतील एक लेखक मच्छिंद्र म्हात्रे उरणातून तयार होत आहे याचा मला अभिमान आहेअसे देखील म्हणाले. या वेळी लेखकाचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघा तर्फे जिल्हाध्यक्ष सुभाष भोपी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच स्नेहबंध समूह,वशेणी इतिहास संपादकीय मंडळ, एस एस एस परिवार,इंडिया झिंदाबाद फ्रेण्ड्स गृप रायगड व अन्य स्नेही बंधू भगिनींकडून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास सेवानिवृत्त मुख्याध्यापक स.रा पाटील गुरूजी , माजी पंचायत समिती सदस्य लवेश म्हात्रे, डी.वाय.एफ.आय.संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष दिनेश म्हात्रे,दिघाटी गावचे माजी सरपंच दत्ताशेठ पाटील, तारा हायस्कूल माजी चेअरमन पी.डी.पाटील,कोमसाप मधुबन कट्टा अध्यक्ष भगवान म्हात्रे, कोमसाप जिल्हा प्रतिनिधी संजय होळकर, रमेश पाटील, सुरेश पाटील, परशुराम पाटील, प्रशांत पाटील,जे.डी .म्हात्रे ,अस्मिता किशोर म्हात्रे, उषा मोकल,प्रमिला गावंड,रेश्मा थवई ,भारती बगाटे, यांच्यासह 200 हून अधिक मान्यवर स्नेही उपस्थित होते.