जिल्हा शासकीय रूग्णालय व सायन हॉस्पिटलतर्फे रत्नागिरीत २४, २६ रोजी तपासणी शिबीर
रत्नागिरी दि.23: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालय रत्नागिरी व सायन हॉस्पिटल मुंबई
यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे 0 ते 18 वयोगटातील मुलांकरीता तपासणी उपचार
शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन 24 व 26 जून 2022 रोजी करण्यात आले आहे.
शिबीरामध्ये हर्निया,
हायड्रोसिल, जननेंद्रियाचे आजार व इतर आजाराने शस्त्रक्रियेस पात्र मुलांवर महात्मा फुले जनआरोग्य
योजनेतून तपासणी-उपचार-शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. शिबीराकरीता सायन हॉस्पिटल मुंबई
यांचेकडील वैद्यकीय तज्ञ पथक यांचे मार्फत उपचार केले जाणार आहेत. शिबीराचा जास्तीत जास्त लाभर्थींनी
लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक रत्नागिरी यांनी केले आहे.