तुतारी एक्सप्रेसला उद्यापासून ५ जादा डबे
एक वातानुकुलीत, दोन स्लीपर तर दोन सेकंड सीटिंगचे अतिरिक्त डबे जोडणार
रत्नागिरी २६ : अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेला असताना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्सप्रेसला पाच डबे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तुतारी एक्सप्रेस २७ ऑगस्टपासून ते १२ सप्टेंबर २०२२ या कालावधीत २४ डब्यांची धावणार आहे.
गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची कन्फर्म तिकीटे मिळणे अवघड झाल्याने कोकण रेल्वे तुतारी एक्सप्रेसला एक एसी थ्री टायर, दोन स्लीपर तर दोन सेकंड सीटिंग असे एकूण पाच डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दादर ते सावंतवाडी दरम्यान धावणारी तुतारी एक्सप्रेस आता 19 वरून 24 डब्यांची धावणार आहे.