देवरुखनजीक दुचाकीची धडक बसून पादचारी वृद्धाचा मृत्यू
देवरुख : देवरुख-संगमेश्वर मार्गावरील साडवली येथे दुचाकीच्या धडक बसल्याने पादचारी वृद्धाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची फिर्याद अजय दत्ताराम नवेले (रा. लोवले) यांनी दिली आहे. दत्ताराम जानू नवेले (68, रा. लोवले, ता. संगमेश्वर) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. दत्ताराम नवेले हे कामानिमित्त सोमवारी साडवली येथे आले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साडवली बस थांबा येथे एस.टी.ची वाट पाहत असताना दुचाकीस्वाराने दत्ताराम नवेले यांना धडक दिली. नवेले यांना गंभीर दुखापत होऊन यामध्ये ते मृत झाले आहेत
रणजीत रमेश शिंदे (रा. कोसूंब) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी दुचाकी चालक रणजित शिंदे याच्यावर देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक तपास डी. एस. पवार करत आहेत.