देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदे यांचा आज शपथविधी शक्य
उर्वरित मंत्र्यांना आठवडाभरात देणार शपथ
मुंबई : बुधवारी संध्याकाळी महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर गुरुवारी नव्या सरकारच्या स्थापनेला वेग आला आहे. आजच सायंकाळी साडेसात वाजता देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गडगडल्यानंतर गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची स्थापना करण्याच्या घडामोडींना वेळ झाला आहे. गुरुवारी दुपारी एकनाथ शिंदे हे गोव्यावरून मुंबई विमानतळावर दाखल झाले.
यानंतर ताज्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी उशिरा आणि मी साडेसात वाजता राजभवनावर देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे उर्वरित मंत्र्यांना आठवडाभरात शपथ दिली जाईल अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.