धार्मिक पर्यटनाला चालना देत ‘भारत गौरव’ ट्रेन निघाली नेपाळला!
पहिली वहिली ‘भारत गौरव’ ट्रेन पर्यटकांना नेपाळसह देशातील आठ राज्यांना देणार भेट
नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाच्या योजने अंतर्गत, पहिली वहिली ‘भारत गौरव एसी टुरिस्ट ट्रेन’ देशाची राजधानी दिल्ली ते नेपाळच्या जनकपूरपर्यंत दि. २१ जून रोजी धावणर आहे. ही रेल्वे रामायण संबंधित गाडी श्री रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देत त्यातून प्रवास करणाऱ्या अनोखी धार्मिक पर्यटन सफर घडवणार आहे.
धार्मिक पर्यटन वाढीस लागावे, यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. आधुनिक सुविधांनी युक्त अशी ही पहिलीच वातातुनूलित ट्रेन रामायण् यात्रे अंतर्गत मर्यादा पुरूषोत्तम श्री प्रभू रामाशी संबंधित ऐतिहासिक तसेच धार्मिक ठिकाणांना भेटी देणार आहे. नेपळमधील जनकपूर येथील जानकी मंदिरास या गाडीतील पर्यटक भेट देतील. आख्यायिकेनुसार भगवात श्राीरामाचे जनकपूर हे विवाह स्थळ. याच ठिकाणी प्रभू रामानी सीता माईंचा हात मिळवण्यासाठी शिवधनुष्य तोडले होते.
ही विशेष वातानुकूलीत गाडी आपल्या एकूण १८ दिवसांच्या धार्मिक सफरीत आठ हजार किलोमीटरचे अंतर कापणार असून दिल्लीतील सफदरजंगहून ती आधी नेपाळला जाईल. याचबरोबर आपल्या पर्यटन सफरीत ही गाडी देशातील उत्तरप्रदेश, बिहार, मधप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगण तसेच आंधप्रदेश अशा आठ राज्यांना देखील भेट देणार आहे. यात अयोध्या, बक्सर, जनकपूर, सीतामढी, काशी, प्रयाग, चित्रकूट, नाशिक, हम्पी, रामेश्वर, कांचीपूरम तसेच भद्राचलम या शहरांना भेट देत तेथील रामायणाशी संबंधित ठिकाणांची माहिती पर्यटकांना देणार आहे.