धुतूमच्या तरुणांचे हेल्थ जिमचे स्वप्न सरपंच रेश्मा शरद ठाकूर यांनी केले पूर्ण
उरण दि 26(विठ्ठल ममताबादे ): दिनांक 24 ऑगस्ट 2022 या दिवशी धुतूम गावातील नवयुवक तरुणांचे अनेक वर्षांचे स्वप्न धुतूम ग्रामपंचायतीने साकार केले असून इम्पोर्टेड इन्स्ट्रुमेंट युक्त अद्यावत जिम् (व्यायामशाळा)चे लोकार्पण सोहळा सकाळी 10.30 वाजता सरपंच रेश्मा शरद ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपसरपंच शरद धावजी ठाकूर यांनी सर्वांचे शब्द सुमनानी स्वागत केले. तर या जिम् साठी प्रसिद्ध सुनील ठाकूर महिला ट्रेनर आणि सुनील ठाकूर व मनोज ठाकूर यांना पुरुष ट्रेनर म्हणून नियुक्त करण्यात आले.
अतिशय छोटखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य सदानंद ठाकूर, अंगत ठाकूर, सदस्या वैशाली पाटील, आशा ठाकूर, सविता ठाकूर,निर्मला ठाकूर, पूजा ठाकूर, तंटा मुक्त अध्यक्ष दत्ता धावजी ठाकूर, ज्येष्ठ नेते अमृत रामचंद्र ठाकूर, ज्येष्ठ नेते रामचंद्र नारायण ठाकूर, कुंदन पाटील, करण सदानंद ठाकूर, प्रकाश परशुराम ठाकूर, तुकाराम मोतीराम ठाकूर, अभय रघुनाथ ठाकूर, महेन्द्र ठाकूर, नंदेश ठाकूर, मेघनाथ ठाकूर, संतोष ठाकूर, साईनाथ ठाकूर, विनोद ठाकूर, जयेश रघुनाथ घरत, आशिष दशरथ ठाकूर, रुपेश ठाकूर, ऋतिक ठाकूर, ज्वाला ठाकूर,हौसाराम गोपीचंद ठाकूर, विकास धावजी ठाकूर, नितीन लक्ष्मण ठाकूर, सूरज रोहिदास ठाकूर, मनीष मनोहर ठाकूर, सतीश भाईजान, प्रमोद शंकर पाटील, सूरज अशोक ठाकूर, नवीनकुमार पाटील, कपिल घरत, परेश ठाकूर युवा क्रिकेटर, जिम् ट्रेनर प्रशोभ भाई आणि सन्माननीय ग्रामस्थ, तरुण युवक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते
या व्यायमाशाळेसाठी ग्रामसेवक विनोद मोरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तर सरपंच रेश्मा शरद ठाकूर आणि सदस्य सदस्या यांनी ही योजना आखून पूर्णत्वास नेली. त्या बद्दल तरुण युवकांनी सरपंच व सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व धन्यवाद मानले.