Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-statistics domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/u179591645/domains/digikokan.com/public_html/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wordpress-seo domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/u179591645/domains/digikokan.com/public_html/wp-includes/functions.php on line 6114
निवळी-गणपतीपुळे मार्गावर कारची ट्रकला भीषण धडक - DigiKokan
https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

निवळी-गणपतीपुळे मार्गावर कारची ट्रकला भीषण धडक

0 96

चालक गंभीर जखमी; वाहतुकीचा सुमारे तासभर खोळंबा


रत्नागिरी ः निवळी- गणपतीपुळे मार्गावरील करबुडे फाटा येथे कारने ट्रकला समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचालक गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात सोमवार 2 मे रोजी सकाळी 7.30 वा. सुमारास घडला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर गणपतीपुळे या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली.
ओंकार प्रमोद साळवी (रा. वरची निवेंडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. या बाबत ट्रक चालक तुषार दशरथ घोसाळकर (27, रा. पन्हाळा, कोल्हापूर) याने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार सोमवारी सकाळी तो आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-09-एल-6604) घेऊन निवळी ते जयगड असा जात होता. त्याच सुमारास ओंकार साळवी आपल्या ताब्यातील कार (एमएच-04-जीजे-2717) घेऊन भरधाव वेगाने समोरुन येत होता.ही दोन्ही वाहने करबुडे फाट्याजवळ आली असता ओंकार याचा कारवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणार्‍या ट्रकला धडक देत अपघात केला. ही धडक इतक जोरदार होती की, त्यात कारचा पूर्ण चक्काचूर झाला तर ट्रकचा पुढील उजव्या बाजूचे चाक अक्षरश: निखळले.
अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाउन अपघाताचा पंचनामा केला. त्या नंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजुला करुन तासभर खोळंबलेली वाहतुक सुरळीत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.