परशुराम घाटातून एकेरी वाहतूक
चिपळूण लोटे परिसरात चार दिवसांपासून अडकून राहिलेल्या अवजड वाहनांची अखेर सुटका
चिपळूण : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दरडी कोसळत असल्याने चार दिवसापासून हा मार्ग बंद केला होता.त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहने चिपळूण व लोटे येथे थांबवून ठेवली होती. मात्र शनिवारी पावसाचा जोर कमी होताच थांबवलेली वाहने परशुराम घाटातून एकेरी पद्धतीने सोडण्यात आली. त्यामुळे चार दिवस अडकून पडलेल्या वाहतुकदारांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सध्या 12 जुलैपर्यंत हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे